“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 22:00 IST2024-11-18T21:57:26+5:302024-11-18T22:00:38+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक आई म्हणून अजितचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळे सहन करत आहे, असे सांगत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती (प्रतिनिधी):बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी एका पत्राद्वारे सभेत संवाद साधला. अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी पत्राचे वाचन केले.
एक आई म्हणून मी अजितचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की, अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझे दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय हे मला माहिती आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळे सहन करतोय. एवढे मोठ मन त्याच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभ रहावे एवढीच तुमच्या अजितच्या आईची तुम्हाला विनंती,अशा शब्दात आशाताइ पवार यांनी हा पत्रात संवाद साधला आहे.