शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
3
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
4
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
5
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
6
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
7
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
8
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
9
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
10
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
11
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
12
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
13
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
14
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
15
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
16
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
17
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
18
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
19
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
20
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 6:48 PM

Baramati Vidhan Sabha: युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

NCP Sharad Pawar Candidate List ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज अखेर आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांच्या या यादीत सर्वांत लक्षवेधी नाव आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे. बारामतीतूनशरद पवारांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी  जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मैदानात असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.  

पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीत कोणा-कोणाला स्थान?

इस्लामपूर- जयंत पाटीलकाटोल- अनिल देशमुखघनसावंगी – राजेश टोपेकराड उत्तर – बाळासाहेब पाटीलमुंबा कळवा – जितेंद्र आव्हाडकोरेगाव – शशिकांत शिंदेवसमत – जयप्रकाश दांडेगावकरजळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकरइंदापूर – हर्षवर्धन पाटीलराहूरी – प्राजक्त तनपुरेशिरुर- अशोक पवारशिराळा – मानसिंगराव नाईकविक्रमगड – सुनील भुसाराकर्जत-जामखेड – रोहित पवारअहमदपूर – विनायकराव पाटीलसिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणेउदगीर – सुधाकर भालेरावभोकरदन – चंद्रकांत दानवेतुमसर – चरण वाघमारेकिनवट – प्रदीप नाईकजिंतूर – विजय भांबळेकेज – पृथ्वीराज साठेबेलापूर – संदीप नाईकवडगाव शेरी -बापूसाहेब पठारेजामनेर – दिलिप खोडपेमुक्ताईनगर – रोहिणी खडसेमुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवेनागपूर पुर्व – दिनेश्वर पेठेतिरोडा – रविकांत बोपचेअहेरी – भाग्यश्री आत्रामबदनापूर – रुपकुमार चव्हाणमुरबाड – सुभाष पवारघाटकोपर (पुर्व) – राखी जाधवआंबेगाव – देवदत्त निकमबारामती – युगेंद्र पवारकोपरगाव – संदीप वर्पेशेवगाव – प्रताप ढाकणेपारनेर – राणी लंकेआष्टी- मेहबूब शेखकरमाळा – नारायण पाटीलसोलापूर शहर उत्तर – महेश कोठेचिपळून- प्रशांत यादवकागल – समरजीत घाटगेतासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटीलहडपसर – प्रशांत जगताप

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार