पुणे : मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. शहराती ठिकठिकाणी बाईक रॅली काढण्यात येत अाहे. दुपारनंतर पुण्यातील अांदाेलनाला हिंसक वळण लागले. पाैड राेडवरील 30 शेअर सायकली अांदाेलकांनी जाळल्या. तर काही खासगी वाहनांनाही लक्ष करण्यात अाले. पुण्यातील मराठा क्रांती माेर्चाच्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. जिल्हाधिकार्यालयाजवळ जमलेल्या जमावाने तेथील सिक्युरिटी केबिन अाणि इतर गाेष्टींची ताेडफाेड केली. चांदणी चाैकातही पाेलिसांवर दगडफेक करण्यात अाली. त्याचबराेबर पाेलिसांची गाडीही यात लक्ष करण्यात अाली. जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पुण्यातील विविध भागात कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन गाड्यांवरुन घाेषणा देत फिरत हाेते. पाैडराेडवरील काही अांदाेलकांनी स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणाऱ्या शेअर सायकल याेजनेतील सायकलींना लक्ष केले. अांदाेलकांनी 30 सायकली जाळल्या. त्याचबराेबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही खासगी वाहनांची सुद्धा अांदाेलकांनी ताेडफाेड केली. पाैड राेडवर मेट्राेचे काम सुरु असल्याने तेथील बुल्डाेजरला अांदाेलकांनी लक्ष केले.
सकाळी सुरु झालेले अांदाेलन संध्याकाळपर्यंतही सुरु हाेते. शहरातील विविध भागात तणावाचे वातावरण हाेते. डेक्कन येथील संभाजी पुतळ्याजवळ माेठा जमाव जमा झाल्याने संभाजी रस्ता पाेलिसांना बंद करावा लागला. त्यामुळे शिवाजीनगरकडून डेक्कनडे तसेच काेथरुडकडे जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसाेय झाली. काही ठिकाणी अांदाेलनकांनी टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.