पुणे: मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा आरोप फेटाळला. निवेदन दिल्यानंतर आंदोलक शांतपणे माघारी परततील, असं मला वाटलं होतं. मात्र काही तरुण मुलांनी हल्ला करत गेट तोडला, असं राम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.
Maharashtra Bandh: पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची आंदोलकांकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:05 PM