लष्कर : लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला लष्कर भागात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या भागातील व्यापारी खुल्या मनाने यात सहभागी झाले नसल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले. लष्कर भागात सकाळी आठ वाजल्यापासून बंद ला सुरुवात झाली. एम जी रोड, सेन्टर स्ट्रीट, भीमपुरा, मोदिखाना, कोळसे गल्ली, गवळी वाडा, घोरपडी आदी ठिकणी दुकाने बंद दिसली. कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपची सत्ता असतानाही बंद यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही हॉटेल्स मात्र सुरू असल्याचे दिसले.
राजकीय पक्षात गटबाजीकाँग्रेस पक्षाचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वात रॅली काढली असता त्यात काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आणि नगरसेवक मात्र दिसले नाहीत.
आमचा कर कमी करा, आम्ही स्वखुशीने बंद मध्ये सामील होऊ
राष्ट्रवादीनेही स्वतंत्र रॅली काढत बंद ला विरोध दर्शवला. जी घटना लखीमपूर येथे घडली त्याचा निषेधच आहे. परंतु नेहमीच इतर सर्व घटनेचा भार व्यापाऱ्यांनी का सोसावा, आधीच कोरोनामुळे आधीच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून हा बंद व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. महाराष्ट्र शासनाने अधिकृत बंद ची घोषणा करायला हवी होती, जर बंद करायचा असेल तर आमचा कर कमी करा, आम्ही स्वखुशीने बंद मध्ये सामील होऊ. असे एम जी रोड च्या व्यापाऱ्यांनी सांगितले.