Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीची रमधुमाळी सुरू झाली असून आज महायुतीकडून अजित पवार यांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर सभेत बोलताना अजित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबातीलच उमेदवार विरोधात असल्यामुळे पवार भावुक झाले, यावेळी यांनी 'आई सांगत होती माझ्या दादाविरोधात फॉर्म भरु नका' , असं अजित पवार म्हणाले. या विधानाला आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला श्रीनिवास पवार यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, ही सभा ऐकली नाही. माध्यमांमधून अजित पवार असं म्हणाले हे समजले. पण, आईने असं काही भाष्य केलेलं नाही. दादा का बोलले त्यांचं त्यांना माहिती. कारण आईला दादा आहेत तसं युगेंद्र आहे. तिला दोन्ही सारखेच आहेत. आई कधी राजकारणावर भाष्य करत नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.
"गोष्ट मी चूक , मी चूक तेव्हासुद्धा मी त्याला करु नको म्हणून सांगत होतो. आपल्या घरातील ती आपली लहान बहीण आहे. पहिलं पाऊलं तिने आपल्यासमोर टाकलंय, तिच तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तु हे करु नको. तर त्यांचं माझ ठरलंय हेच वाक्य होतं. माझा राजकारणात काहीच संबंध नाही, माझा मुंबईत आणि इकडे व्यवसाय आहे. पण साहेबांना खूपच एकट पाडलं म्हणून मी आलो, आईने युगेंद्रच्या उमेदवारीला विरोध केला असं काही नाही, युगेंद्र आईसोबत बोलत होता तेव्हा तिने तुला हव काय योग्य वाटत ते कर शेवटी मला दोघेही सारखेच, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.
श्रीनिवास पवार म्हणाले, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीने हे करु नका म्हणून सांगितलं होतं, तरीही तुम्ही तेच केलं. युगेंद्र शरद पवार यांनाच फॉलो करतो. बारामती साहेबांच्या विचारांची आहे, आता अजित पवार शरद पवार यांच्या विचारांचे राहिले नाहीत. त्यांचे विचार भाजपाचे विचार आहेत, बारामती शरद पवार यांच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे त्यांना पाहिजे तो उमेदवार द्याला लागला, असं स्पष्ट पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी लोकसभेत सगळ्यांच्या नकला केल्या, आता त्यांच्यावर ती वेळ आली, आता ते लोकांना फोन करुन भेटायला बोलवत आहेत. आता त्यांचं भाषण लिहून दिलं जातं, त्यामुळे भाषणावर कंट्रोल आला आहे, असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
'युगेंद्रच्या मागे शरद पवार'
"युगेंद्रच्या मागे शरद पवार आहेत. पवार सगळ्यांना सांगतात मला सरकार बदलायचं आहे, युगेंद्रच्या मागे शरद पवार, सुप्रिया सुळे आहेत, असंही पवार म्हणाले. मी काही दिवसापूर्वी आईला भेटायला गेलो तेव्हा माझी आणि अजित पवार यांची भेट झाली होती तेव्हा थोड बोलण झालं होतं, आमच्या नात्यात बदल झालेला नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.