शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:24 AM

भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे.

मुंबई  - भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे. बंदमुळे फेºया रद्द झाल्यास आरक्षित तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.भीमा कोरेगाव घटनेमुळे मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत राज्यभरात १८७ एसटी बसचे नुकसान झाले. मराठवाडा, विदर्भ या भागात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती महामंडळाने दिली.मंगळवारी संघटनांकडून ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या काळात एसटी प्रशासनाने स्थानक-आगारातील गर्दी पाहून बस चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विभागीय पातळीवर सर्व माहिती निंयत्रण कक्षासह वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांना ‘मेल’ करा, अशा सूचना महामंडळाने परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य आहे. तथापि त्या व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या एसटी सेवेला ‘लक्ष्य’ करणे योग्य नाही. याच त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटीचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले.प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवलेप्रवाशांपेक्षा महामंडळाला आपल्या बसची अधिक काळजी असल्याची घटना मंगळवारी घडली. पुण्याहून मुंबईकडे आलेल्या एसटीच्या शिवनेरीच्या चालकाने खारघरला पोहोचल्यावर बस पुढे जाणार नाही, येथेच उतरुन घ्या, असे सांगितले. बहुतेक प्रवासी उतरून गेले; मात्र काही प्रवाशांनी आक्षेप घेतला. एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना फोन केले; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी वाद घातल्यानंतर शिवनेरी चालक बस घेऊन वाशी महामार्गापर्यंत सोडण्यास तयार झाला. परिणामी मुंबईपर्यंतचे प्रवासी भाडे अदा करणाºया प्रवाशांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. हार्बर मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना ठाणे मार्गे मुंबई गाठावे लागले.आज शाळा सुरू; स्कूल बस बंद!च्भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटू लागल्याने मंगळवारी बहुतेक शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुपारीच विद्यार्थ्यांना घरी सोडले. दरम्यान, बुधवारी विविध संघटना व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतरही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा बंद ठेवण्यास नकार दिला आहे. बुधवारी तणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागणार आहे.च्याबाबत पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली. तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही. बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूलबस बाबत निर्णय घेण्यात येईल. वैयक्तिक विद्यार्थी वाहतूक करणाºयांनी परिस्थिती पाहून वाहतूकीबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे