पुणे : उपप्रादेशिक परिवहन कार्यालये प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्यासंदर्भातील आदेश शासनाने काही दिवसांपूर्वी जारी केला. त्यामुळे राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. परिणामी, दर्जा वाढलेल्या कार्यालयांचा प्रमुख (प्रादेशिक परिवहन अधिकारी) म्हणून काम करण्यासाठी आता ९ डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून या शासन निर्णयाची प्रतीक्षा होती. हा निर्णय झाल्यामुळे आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच डेप्युटी आरटीओंना दिलासा मिळाला आहे.
नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालये..
- पिंपरी -चिंचवड
- अकोला
- अहमदनगर
- जळगाव
- वसई (जि. पालघर )
- सोलापूर
- चंद्रपूर
- बोरिवली (मुंबई)
- सातारा