शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

Maharashtra Election 2019 : पुण्यात विधानसभेच्या २१ जागांसाठी २४६ उमेदवार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:02 PM

कॅन्टोन्मेंट, पिंपरीत सर्वाधिक उमेदवारसंख्या

ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ जागांसाठी ४४५ उमेदवारांनी ५९५ अर्ज होते नेले पिंपरीतील १३ उमेदवरांनी व कॅन्टोन्मेंटमधील ३० उमेदवारांनी घेतली माघार

पुणे : युती अथवा आघाडी झाल्यामुळे बंडाचे निशाण फडकाविलेल्या अनेकांनी आपले बंड सोमवारी म्यान केले. जिल्ह्यातील तब्बल १२७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता २१ जागांसाठी २४६ उमेदवार रिंगणात असतील. जिल्ह्यात कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वाधिक  २८ उमेदवार असून, खालोखाल पिंपरीमध्ये १८ उमेदवार असतील. याच दोन मतदारसंघांत दोन बॅलेट युनिटची (बीयु) गरज भासणार आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय भेगडे, माधुरी मिसाळ, लक्ष्मण जगताप, ‘राष्ट्रवादी’चे अजित पवार, अतुल बेनके, काँग्रेसचे संजय जगताप आदी प्रमुख निवडणूक लढवत आहेत.सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील निवडणूककामांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील २१ जागांसाठी ४४५ उमेदवारांनी ५९५ अर्ज नेले होते. छाननीमध्ये त्यातील ३७३ अर्ज वैध ठरले. वैध उमेदवारांमधील १२७ जणांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे २४६ उमेदवार अंतिम असतील. पिंपरीतील १३ उमेदवरांनी व कॅन्टोन्मेंटमधील ३० उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतरही या दोन मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार आहेत. येथे दोन बॅलेट युनिट बसवाव्या लागतील. यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व मतदान केंदे्र ही तळमजल्यावरच राहतील. त्यासाठी काही मतदान केंद्रांची स्थळेदेखील बदलली आहेत. पोस्टल बॅलेटच्या मतदानाची प्रक्रिया, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीची प्रसिद्धी, मतदान स्लिपावाटपाचा कार्यक्रम, मतदान आणि मतमोजणीच्या कामाची तयारीदेखील झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. .........६० लाखांचे संशयित बँक व्यवहार जिल्हा प्रशासनाने बॅँक खात्यातील तब्बल ६० लाखांच्या संशयित व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. मद्यासाठी रोख रक्कम असा १ कोटी ३१ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल तपास पथकांनी जप्त केला आहे. त्यात पर्वती मतदारसंघात पकडलेल्या १७ लाख ९७ हजार ४९० रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. ......साडेपाच हजार मतदार बजावणार पोस्टल मतदानाचा हक्कजिल्ह्यात निवडणूक कामांवर असलेले सरकारी अधिकारी, पोलीस व सैनिक मिळून तब्बल ५,७९५ मतदार हक्क बजावतील. त्यांना मंगळवारी (दि. ८) आॅनलाईन मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत. त्या मतपत्रिका डाऊनलोड करून संबंधित मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे संबंधितांना पाठवाव्या लागतील. लोकसभेला ६० टक्के पोस्टल मतदान झाले होते. विधानसभेला शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट आहे............जिल्ह्यातील ११८७ मतदान केंद्रांमध्ये बदलजिल्ह्यात २४९ सहायकारी मतदान केंद्रांसह एकूण ७,९१५ मतदान केंदे्र आहेत. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील. या निवडणुकीसाठी तब्बल १ हजार १८७ मतदान केंदे्र स्थलांतरित करण्यात आली आहेत. चिंचवड व वडगावशेरीतील प्रत्येकी १७५ केंदे्र, पिंपरी १४५, कोथरूड १४१, खडकवासला १४० व हडपसरमधील सर्वाधिक १३६ मतदान केंद्रे बदलण्यात आली आहेत. ..........विधानसभानिहाय रिंगणात असलेले उमेदवार    मतदारसंघ    माघार     अंतिम         घेतलेली    उमेदवार             संख्या    संख्या    जुन्नर     १    ११    आंबेगाव    ३    ६    खेड-आळंदी    ४    ९    शिरूर    ५    १०    दौंड    ४    १३    इंदापूर    १५    १५    बारामती    २    १०    पुरंदर    ५    ११    भोर    ४    ७    मावळ    ३    ७    चिंचवड    ३    ११    पिंपरी    १३    १८    भोसरी    ६    १२    वडगावशेरी    ५    १२    शिवाजीनगर    ०    १३    कोथरूड    १०    ११    खडकवासला    २    ७    पर्वती    ४    ११    हडपसर    ५    १४    पुणे कॅन्टोन्मेंट    ३०    २८    कसबा पेठ    ३    २१०

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण