पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 160 मिळतील असा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वर्तवला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे नेते मोठया संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, आम्ही आभासी आकडा सांगत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मागील वेळेपेक्षा साधारण दुप्पट म्हणजे 160 जागा मिळतील. गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसी समाजकरिता खूप काम केल्याचा दावा केला मात्र नेमके काय काम केले हे त्यांनी सांगत नाही.याउलट 2008मध्ये काँग्रेस सरकार असताना आम्ही ओबीसी समाजाला आरक्षण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडीला १७५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :- पाच वर्षात पुणे स्मार्ट सिटी झाले का ? आत्तापर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत कोणतीही तरतूद आली नाही. सर्व प्रकल्प रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. कोणतीही तरतूद झाली नाही.
- सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना कोणतीही मदत नाही. सरकारची निराशाजनक कामगिरी
- आचारसंहितेपुर्वी आश्वासन दिले मात्र कोणतेही काम केले नाही ही वस्तूस्थिती
- राज्यशासनाने केंद्राकडे 8 हजार 500 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता पण आत्तापर्यन्त दमडीही आली नाही.