सासवड : राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीहून आलेल्या नेत्यांच्या भाषणाचे मराठीत भाषांतर करून सांगतात. स्थानिक प्रश्नावर बोलत नाहीत. दिल्लीतील नेते महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलतात व शरद पवारांवर टीका करतात. पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे, असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुरंदरमधील आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी शिवरी येथे मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, की दौंड, बारामती येथे अद्ययावत प्रशासकीय इमारती झाल्या, परंतु पुरंदरला झाली नाही, जेजुरी एमआयडीसीमधील ८० टक्के कारखाने बंद आहेत, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे. पुरंदरमधील जलयुक्त शिवारकामात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला, असे त्याच खात्याचे मंत्री सभागृहात सांगतात, त्या प्रकरणाची चौकशी आता संजय जगताप आमदार झाल्यावर त्यांनी करावी, असेही सुळे म्हणाल्या. दोन्ही काँग्रेस पक्षाची आघाडी झाल्याने पुरंदरचा आमदार आघाडीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संभाजी झेंडे यांनी दिवे येथील आतंरराष्ट्रीय बाजार ही एक अफवा असल्याचे सांगितले. सुदाम इंगळे यांनी थापाड्या माणसाला घरी बसवणार असल्याचे सांगितले. यावेळी निरीक्षक हरीश सणस, प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे, अशोक टेकवडे, माणिकराव झेंडे-पाटील, प्रदीप पोमण यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मार्तंड भोंडे, वीणा सोनवणे, प्रदीप लांडगे, मोहन वांढेकर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ......४उमेदवार संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर कडक भाषेत टीका केली, दहा वर्षांत एकही काम पूर्ण केले नाही, गुंजवणी धरण पाणी योजना, चौपदरी रस्ता अशी कामे केली नाहीत व आता मी काम अडविले, अशी टीका करीत आहेत. पाच वर्षे गप्प बसले व आता कोर्टाचे कारण सांगत आहेत. पुरंदरमध्ये इथून पुढे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रच राहतील व जनतेचे प्रश्न सोडवतील, असेही जगताप म्हणाले.
Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्री दिल्लीच्या नेत्यांच्या भाषणाचे मराठीत भाषांतर करुन बोलतात : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 1:50 PM
दिल्लीतील नेते महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलतात व शरद पवारांवर टीका करतात...
ठळक मुद्देजगताप यांच्या प्रचारार्थ शिवरीत मेळावा : भाजप सरकारने पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे,