Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येणार : अतुल बेनके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:28 PM2019-10-11T13:28:34+5:302019-10-11T13:28:58+5:30
अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद
नारायणगाव : शेतकऱ्यांचे हित जपणारे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे राज्य येणार आहे , असे प्रतिपादन जुन्नर विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी ओतूर येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी रोहकडी , ओतूर, डुंबरवाडी या परिसरातील मतदारांशी भेट घेत संवाद साधला व प्रचाराच्या निमित्ताने ओतूर येथे मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. शहरातून निघालेल्या पदयात्रेत स्थानिक ग्रामस्थ, पादाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या पदयात्रेत जि.प.सदस्य मोहीत ढमाले, पं स.सदस्य विशाल तांबे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, नासीर मनियार, किशोर होनराव, डॉ. जी .एम डुंबरे, माजी जि.प.सदस्य तुषार थोरात, संतोष होनराव ,शकील तांबोळी आदी कार्यकर्ते सहभागी होते . ही पदयात्रा मुख्य बाजारपेठ , भाजीपाला बाजारातून संपूर्ण शहरातून नेण्यात आली.
अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधून कांदा , भाजीपाला यांना हमीभाव मिळवून देण्याची ग्वाही दिली़. सध्याचे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधात आहे़. शेतकऱ्यांच्या हितासाठी यावेळी राज्यात परिवर्तन करून आघाडीचे सरकार आणावयाचे असून मोठ्या मताधिक्याने आघाडीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले़.