शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:48 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक नकारात्मक राजकारणामध्ये अडून पडले ..

ठळक मुद्देभाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी बाणेर येथे जाहीर सभा

बाणेर : नकारात्मक राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक अडून पडले असताना भाजपने गल्ली ते दिल्ली सर्वच स्तरांवर विकासाचा अजेंडा यशस्वीपणे राबवला आहे़ विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले़ भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी बाणेर येथील जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते़ या वेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना बाहेरचा उमेदवार म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या नेतृत्वाकडे देखील पाहिले पाहिजे़. वायनाड मतदारसंघामध्ये जाऊन निवडणुका लढविल्या आहेत, बाहेरच्या मतदारसंघात निवडणुका लढण्याची काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक केवळ नकारात्मक मानसिकतेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे विकास प्रकल्पांवर अजेंडा नाही. ते फक्त मोदी-शहा आणि फडणवीस यांच्यावर टीका करीत कांगावखोर भाषणे करीत आहेत. त्यामुळेच जनतादेखील विकासाभिमुख भाजप महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाढत्या संख्येने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर आमचा भर असेल़ या कार्यक्रमास खासदार गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.......माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेशकाँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, तसेच कोथरूड मतदारसंघाचे माजी मनसे विभागप्रमुख विनोद मोहिते यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला़ तसेच, रावसाहेब दानवे यांचे भाषण सुरू असताना बाणेर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांचे बंधू मारुती चांदेरे, बाजीराव चांदेरे, मयूर चांदेरे यांनी व्यासपीठावर येत भाजपमध्ये प्रवेश केला़ 

टॅग्स :PuneपुणेBanerबाणेरRaosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा