शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 7:00 AM

Pune Election 2019 : शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देशिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचे दिले आदेश

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा झाली.परंतु,शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.त्यावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचे आदेश दिले.मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरच पुणे शहरातील सेनेच्या कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन केले किंवा नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.भाजप-शिवसेना युतीबाबत संभ्रम असल्याने शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र, युतीचा निर्णय झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न भंगले. पुणे शहरात २०१४ मध्ये भाजपचे आठही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे भाजपकडून पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही.परिणामी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड करून निवडणुक लढण्याचा पवित्रा घेतला. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे पक्षाचा राजीनामा देवून कसबा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले.धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला.त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे समोर आले.पुणे शहरात शिवसेनेला बळ मिळावे,यासाठी विधानसभेत सेनेचा एकतरी प्रतिनिधी असला पाहिजे, अशी भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या तिकिट वाटपानंतर व्यक्त केली. मात्र, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी भाजप-सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांची समजुत काढली. परिणामी भाजप-शिवसेनेमधील धुसपुस उघडपणे समोर आली नाही. कणकवलीत युतीधर्म पाळला जात नसेल तर पुण्यात युतीधर्म का पाळावा,अशी चर्चा दबक्या आवाजात पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून केली जात होती. कोथरूड विधानसभा मतदार संघातून थेट भाजपचे प्रदेश अध्यक्षच निवडणुक लढवत असल्यामुळे या मतदारसंघात सेनेने प्रामाणीकपणे युतीधर्म पाळला.शहरातील इतर मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर सेनेचे काही कार्यकर्ते दिसत होते.परंतु,लोकसभेच्या वेळी ज्या प्रकारे एकत्रित येवून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले तसे काम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसले नाही,असे बोलले जात आहे.मात्र,निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच युतीधर्माचे पालन झाले किंवा नाही याबाबत चिंतन होईल.-----------------पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.मात्र,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वांना युतीधर्म पाळण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार सर्वांनी भाजपसाठी काम केले.तसेच खासदार गिरीश बापट व मी स्वत: नाराज कार्यकर्त्यांची समजुत काढली.त्यामुळे युतीमधील भाजप या मित्रपक्षाच्या उमेदवारांना शिवसेनेने मदत केली.त्यामुळे युतीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल.- बाळा कदम, संपर्क प्रमुख,शिवसेना, 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाVotingमतदान