Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 02:08 PM2019-10-14T14:08:46+5:302019-10-14T14:09:43+5:30

लोकांच्या मनात जे ठरतं तेच मतात उतरतं...

Maharashtra Election 2019 : Give Hadapsar's leadership to Chetan Tupe hand : Dr. Amol Kolhe | Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे

Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे

ठळक मुद्देचेतन तुपेंच्या प्रचारार्थ रॅली

हडपसर :  छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेऊन जनतेला फसविण्याचे काम केल्याचा निशाणा साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हडपसर मतदारसंघाचे नेतृत्व चेतन तुपे यांच्या हातात द्यावे, असे आवाहन केले.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ रविवारी मुंढवा, केशवनगर, मांजरी, महादेवनगर, आकाशवाणी, सातववाडी, गोंधळेनगर, तुकाई दर्शन, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसरगाव, रामटेकडी या मार्गावर ही रॅली झाली. 
राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी हडपसर मतदारसंघात रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. या वेळी बाळासाहेब शिवरकर, सुरेश घुले, राजलक्ष्मी  भोसले, कैलास  कोद्रे, प्रशांत जगताप, योगेश ससाने, बंडू गायकवाड, पूजा कोद्रे, हेमलता नीलेश मगर, वैशाली बनकर, प्रशांत तुपे, नंदा लोणकर, आनंद अळकुंटे, फारुक इनामदार, अशोक कांबळे, अजिंक्य घुले, सुनील बनकर, निलेश मगर, दिलीप तुपे, संजय लोणकर, दिलीप घुले, लाला गायकवाड, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉंग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
.............
तेच मतात उतरतं...
जयंत पाटील यांनी रॅलीदरम्यान प्रत्येकाशी संवाद साधत जनतेला चेतन तुपे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. 
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आमदार हा जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा असावा, लोकांमध्ये जाऊन, त्यांच्या सुख-दु:खाशी समरस होत त्यांच्या भावना जाणून घेणारा, मन जपणारा असावा. लोकांच्या मनात जे ठरतं तेच मतात उतरतं. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Give Hadapsar's leadership to Chetan Tupe hand : Dr. Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.