शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Maharashtra Election 2019 : "तेव्हा मुस्लीम मते मिळाली नव्हती; कोण कुणाची ‘बी टीम’ हे जनता जाणते"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 4:50 AM

'जितके मुस्लिम समाजाचे मतदान आहे, तेवढे सगळे आम्हाला मिळालेले नाही'

- धनाजी कांबळेपुणे : वंचित बहुजन आघाडीबाबत आता सगळेच राजकीय पक्ष बोलायला लागले आहेत. याचा अर्थ असा होतो, की प्रस्थापितांच्या गडांना धक्का देण्याची ताकद वंचितमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मते मिळाली नाहीत. ती यावेळी मिळतील. त्यामुळे विरोधीपक्षनेता नव्हे, तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीसोबत आता एमआयएम नाही, त्याचा काय परिणाम होईल?- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४१ लाख मते मिळाली आहेत. यात एमआयएमचाही काही प्रमाणात वाटा आहे. मात्र, जितके मुस्लिम समाजाचे मतदान आहे, तेवढे सगळे आम्हाला मिळालेले नाही. आता मौलवींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मुस्लिम समाजाचीही मते मिळतील.

वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हटले जाते, त्याचे काय?- आज कोण कोणत्या पक्षातून कुठे गेलेत, हे सर्वश्रुत आहे. जे त्यांच्या पक्षांचे मूळचे निष्ठावान होते, त्यांना डावलून जे आयाराम आहेत त्यांना तिकीटे दिली आहेत. त्यामुळे कोण कुणाची बी टीम की ए टीम आहे, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता जाणते.

वंचितने सर्व समूहांना उमेदवारी दिली आहे, हे सोशल इंजिनिअरिंग कितपत यशस्वी होईल?- प्रस्थापितांना धडकी भरावी एवढी ताकद निश्चितपणे वंचितमध्ये आलेली आहे. आम्ही केवळ घोषणाबाजी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तर आम्ही एक ठोस असे व्हीजन घेऊन दृष्टीकोन घेऊन मैदानात आहोत. जनतेच्या कल्याणाचा मार्ग काय असू शकतो, हे आमच्याच पक्षाने दाखवून दिले आहे. तसा जाहीरनामा आम्ही मांडला आहे. आरएसएसच्या विचारसरणीनुसार चाललेल्या सरकारला ही परिस्थिती अशीच राहावी, असं वाटतं. बलुतेदार, आलुतेदार अशा सर्वच दुर्लक्षित घटकांना आम्ही उमेदवारी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, वंचितचा विरोधीपक्ष नेता असेल, खरे काय?- कुणी काय बोलावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु, आमची ताकद वाढली आहे, हे यावरून दिसते. त्यामुळे आमची भीती वाटत असल्यानेच ते असे बोलत असावेत. वंचितचा विरोधीपक्षनेता नव्हे, तर सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आहे.

कोणते मुद्दे घेऊन तुमचा पक्ष मतदारांपुढे जात आहे?- अच्छे दिनचे स्वप्न दाखवून ते सत्तेवर आले. पण आज हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. अ‍ॅटो सेक्टर, रिअल इस्टेटमध्ये मंदी आली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत हे मुद्दे आहेत. आमच्याकडे रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम आहे. आशा कर्मचारी, अगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे प्रश्न प्रलबित आहेत. पोलिसांची ड्युटी आजही निश्चित वेळेची नाही. ती केवळ कागदावरच आहे. त्यांच्यासाठी ८ तासांची ड्युटी करायची आहे. शेतीपूरक उद्योगांना चालना दिली जाईल. सहकारी बँकांची पुनर्रचना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. खरं तर बाबासाहेबांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात आणण्यासाठी आम्ही सत्ता मागत आहोत.राज्यात ४३ लाख बोगस मतदारराज्यात ४३ लाख बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएमबरोबरच बोगस मतदारांवर लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक मतदाराला एक इपिक नंबर असतो, तो नंबर दुसºया कोणत्याही मतदाराला नसतो, असे असतानाही राज्यात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत. त्याची नोंदणीही झाली आहे. प्रशासकीय अधिकारी देखील यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यामुळे निश्चितपणे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019