पंतप्रधान मोदी आज पुण्यात, मुख्यमंत्री बारामतीतपुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. मतदान २१ ऑक्टोबरला होत असून प्रचार संपण्यास (दि. १९) आता केवळ ७२ तास म्हणजे फक्त तीनच दिवस उरले आहेत. त्यातच पंतप्रधान गुरुवारी पुण्यात येत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची बारामतीत सभा होत आहे.विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी प्रचाराची रंगत वाढू लागली. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. युती व आघाडी यांच्यात लढत आहे. तरीही पुणे जिल्हा हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्याला खिंडार पाडण्यासाठी युतीने कंबर कसली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री, तर शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बारामतीत सभा आहे. माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर हेलिपॅडचे काम सुरू आहे. गुरुवारीच मुख्यमंत्र्यांची दौंड व इंदापूरला सभा होत आहे कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने जिल्ह्यातून सर्वच मतदारसंघांचे गावभेटीचा धडाका लावला आहे. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रचारसभा घेण्यात दंग आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच वर्षांत सत्ताधाºयांनी कोणते प्रश्न सोडवले, याची विचारणा ते करीत आहेत. वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी बारामतीत सभा झाली. त्यांनी विरोधकांना धारेवर धरत सत्तेसाठी ‘वंचित’ने चंग बांधल्याचे सांगितले............
सप महाविद्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूपआता उरलेल्या तीन दिवसांत युती व आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा जिल्हाभर होणार आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच मोठ्या गावांत पोलिसांनी संचलन केले व गुन्हेगारांना जरब बसवली. कामगार व नागरिकांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावे, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. कामगार आयुक्तांनी मतदानादिवशी पगारी सुटी जाहीर केली आहे. मतदानासाठी कामगारांना सुटी देण्याच्या सूचना कंपनी, कारखाने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची गुरुवारी सभा होत असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सभेसाठी पावसाच्या शक्यतेमुळे वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे काम गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांचा वेढा असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.