Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:43 PM2019-10-04T12:43:43+5:302019-10-04T12:44:41+5:30

रोहित टिळकांच्या विनंतीला मान देत कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले.

Maharashtra election 2019 : ravindra dhangekar withdrawal from kasba election | Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

googlenewsNext

पुणे : काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी सकाळी समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. अपक्ष म्हणून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, त्यामुळे कसब्यात महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या अडचणीत वाढ झाली होती. परंतु, शुक्रवारी सकाळी आपण रोहित टिळकांच्या विनंतीला मान देऊन कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे  जाहीर केले. आता भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत कसब्यात होणार आहे. 

कसब्यातून धंगेकरांऐवजी काँग्रेस पक्षाकडून अरविंद शिंदे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आमदारकीच्या निवडणुकीची तयारी करत असलेल्या धंगेकरांना धक्का बसला. उघड उघड आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसह घेतला होता. मात्र, रोहित टिळकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी माघार घेतली असल्याची माहिती स्वतः धंगेकर यांनी दिली. तरीदेखील शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांचीही समजून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होत असून ते मात्र आपलय अपक्ष लढण्यावर ठाम आहे. धंगेकर याची बंडखोरी काँग्रेसला अडचणीची ठरली असती. त्यामुळे काँग्रेसचे रोहित टिळक यांंनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले अशी माहिती धंगेकर यांनी दिली. रोहित टिळक मागील दोन निवडणूकात काँग्रेसचे ऊमेदवार होते. 

धंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या परिसरातील प्रभागातून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. पालिका निवडणुकीच्या आधी त्यांनी मनसेचा त्याग केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश न करता त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून राहणे पसंत केले. काँग्रेसनेही त्यांना पुरस्कृत केले. भाजपच्या गणेश बीडकर यांचा त्यांनी पराभव केला.  की धंगेकर यांचे नाव आघाडीवर होते; मात्र ऐनवेळी ते पक्षाचे सहयोगी सदस्य असल्याचे व त्यांचा काही भरोसा नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे शिंदे यांचे नाव पुढे आले व उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली.

Web Title: Maharashtra election 2019 : ravindra dhangekar withdrawal from kasba election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.