शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Maharashtra Election 2019 : 'यंदा बघतोच, तू कसा आमदार होतो' चा पुनरुच्चार करत अजित पवारांचा शिवतारेंंना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 4:42 PM

Maharashtra Election 2019 : सूर्यावर थुंकू नको..

ठळक मुद्देसंजय जगताप यांच्या प्रचारासाठी सासवडला पावसात जल्लोषात सभा

सासवड :-राष्ट्रवादीचे सोडून गेलेला एक आता राष्ट्रवादी संपविण्याची भाषा करू लागला आहे, त्याने त्याच्या औकातीत राहावे. त्याची सगळी अंडीपिल्ली मला माहित आहेत असे बोलत जालिंदर कामठेंवर तर शरद पवार यांवर टीका करणाऱ्या शिवतारेंना, सूर्यावर थुंकू नको असे सांगत बारामती येथील सभेतील ' यंदा बघतोच, तू कसा आमदार होतो उद्गाराचा पुनरुच्चार करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे.   महाराष्ट्रात आघाडीची सुप्त लाट आहे पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय घेऊ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवड येथे केले. आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचाराची सांगता सभा सासवड येथील पालखी मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाऊस असूनही सभा प्रचंड जल्लोषात झाली.  

पुरंदर - हवेलीच्या विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यातच आहे. यासाठी संजयच्या रूपाने खणखणीत नाणे दिले आहे, ते खणखणीतच वाजवा आणि शरद पवार यांच्या सूचनेनुसार जगताप यांना पुरंदर - हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांच्या प्रचारार्थ भेकराईनगर ते सासवड भर पावसात भव्य रॅली काढण्यात आली.     यावेळी अजित पवार म्हणाले , पुरंदर - हवेलीच्या विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यातच आहे. यासाठी संजयच्या रूपाने खणखणीत नाणे दिले आहे, ते खणखणीतच वाजवा आणि शरद पवार यांच्या सूचनेनुसार जगताप यांना पुरंदर - हवेलीच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. युती सरकारने ५ वर्षांत विकासाचे काही काम केले नाही, केवळ फसव्या घोषणा केल्या, शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचे प्रामण वाढले, कायदा सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे आता सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली असून राज्यात आघाडीची सुप्त लाट असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी शिवतारे यांना निवडणूक आल्यावरच गुंजवणीचे पाणी आठवते. मात्र हे पाणी आणण्याची त्यांच्यात धमक आणि ताकद नाही असे सांगत पवार यांनी ते आता आजारी असल्याची नौटंकी करत असून भावनिक करून मते मागतील, त्याला बाली पडू नका. पुरंदरच्या विकासासाठी, पुरंदर उपसा, जनाई उपसा योजना व्यवस्थित चालविण्यासाठी आणि गुंजवणीचे पाणी आणण्यासाठी आघाडीतील भक्कम, धडधाकट माणसाची गरज असल्याने त्यासाठी संजय जगताप यांना उमेदवारी दिली आहे.     उमेदवार संजय जगताप यांनी पुरंदरच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक संधी द्या असे आवाहन करीत, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना करून घरोघरी शुद्ध पाणी, शेतीला बारमाही पाण्याची योजना,  उच्च शिक्षणाच्या सुविधा, असल्याची ग्वाही दिली.  शिवतारेंवर टीका करताना ५ वर्षात यांना पाणी, रोजगार, कोणते काम पूर्ण करता आले का, असा प्रश्न विचारीत हाताच्या पंजाला मतदान करण्याचे आवाहन केले. सासवड, जेजुरी च्या पाणी योजनेचे उदाहरण देत अशी कामे करायची असतात असे त्यांनी सांगितले. तर स्वाभिमानी पुरंदरला दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा कलंक लावणा-याला हद्दपार करण्याचे आवाहन संजय जगताप यांनी केले.      यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे, हरीश सणस, विजयराव कोलते, सुदामराव इंगळे, संभाजीराव झेंडे, दिलीप बारभाई, आदींनी भाषणातून संजय जगतापांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. यावेळी माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमण, दत्ता झुरंगे, प्रहारच्या सुरेखा ढवळे, दिलीप गिरमे यांसह सर्व नगरसेवक, पुरंदर हवेलीतील विविध गावांतील महाआघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवाजी पोमण, महेश जगताप यांनी सुत्रसंचलन केले. 

संजय जगताप यांना विजयी करा : शरद पवार पावसामुळे हेलिकॉप्टर येऊ शकत नसल्याने माझी इच्छा असूनही मला सासवडला येत आले नाही. आघाडी एका विचाराने निवडणूक लढवीत आहे, संजय जगताप यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे सासवडच्या सभेत केले. .

टॅग्स :JejuriजेजुरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक