वडगावशेरी : वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.. तो सोडवण्यासाठी अनेक मार्गानी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कॉमर्स झोन ते सावंत पेट्रोल पंप असा महत्त्वपूर्ण रस्ता केला. या परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल उभारणार असल्याचे मत आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. वडगावशेरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज बरमाशेल, फायू नाईक चौक, टिंगरेनगर, सिद्धेश्वरनगर, सावंत पेट्रोल पंपच्या आणि भीमनगरमध्ये पदयात्रेद्वारे प्रचार केला. या वेळी भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक कर्णे गुरुजी, नाना सांगडे, शीतल सावंत, राहुल भंडारे, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, विशाल साळी, सुधीर गलांडे, माजी नगरसेवक भगवान जाधव, भीमराव खरात, सागर माळकर, सुनील गोगले, अजय सावंत, अजहर खान आदी उपस्थित होते........मुळीक म्हणाले, कामामुळे तसेच अनेक कारणांमुळे नागरिकांना व्यायाम करता येत नाही. व्यायामशाळेत जाणे आर्थिकदृष्ट्या परवड नाही. या ओपन जिममध्ये अनेक प्रकारचे व्यायाम करता येत आहे. या जिमचा वापर तरुण, महिला तसेच वयोवृद्ध करत आहेत. व्यायामामुळे मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य सुधारणार आहे.त्यामुळे नागरिकांना मोफत व्यायाम करता यावा यासाठी उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी शेकडो ओपन जिम सुरू केले आहेत. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते. मनातील व शरीरावरील ताणतणाव कमी होतो.