पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या ४८८ फेऱ्या होणार असून, त्यासाठी साडेतीनशे मोजणी टेबल ठेवण्यात येणार आहेत. खेड आणि शिरुर या मतदारसंघात सर्वाधिक २८ फेऱ्या होणार आहेत. तर, टपाली मतदानासाठी ६५ टेबल असतील. सर्व मतदारसंघातील मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होईल. वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबापेठ या मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या धान्य गोदामात होईल. चिंचवड, पिंपरी, भोसरीची मतमोजणी म्हाळूंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. जुन्नरची मतमोजणी जुन्नर देवस्थान, अवसरी येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक कॉलेजमधे आंबेगावची, खेडची राजगुरुनगर येथील राजगुरु क्रीडा संकुल, दौंडची शासकीय धान्य गोदाम, इंदापूर तालुक्यातील धान्य गोदामात इंदापूरची आणि बारामतीची मतमोजणी एमआयडीसीतील राज्य सरकारच्या धान्य गोदामात होईल. ढुमेवाडी येथील शसकीय औद्योगिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधे पुरंदरची, भोरची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि मावळची तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च संस्थेत मतमोजणी होईल. जिल्ह्यातील ७ हजार ९१५ मतदानकेंद्रातील मतपेट्यांची मोजणी होणार आहे. त्यासाठी साडेतीनशे टेबल, टपाली मतदानासाठी ६५ टेबल असतील. मतमोजणीच्या ४८८ फेऱ्यांचे नियोजन आहे.-----------------
मतदारसंघ टेबल टपाली टेबल एकूण फेऱ्याजुन्नर १४ १ २६आंबेगाव १४ ३ २४खेड १४ १ २८शिरुर १४ १ २८दौंड १४ १ २२इंदापूर १४ १ २४बारामती १४ १ २७पुरंदर १८ १ २२भोर २२ २ २५मावळ १४ ३ २७चिंचवड २२ ५ २३पिंपरी २० ५ २०भोसरी २० ५ २१वडगावशेरी २० ७ २२शिवाजीनगर १४ ७ २०कोथरुड १८ २ २१खडकवासला २० २ २३पर्वती १६ ७ २२हडपसर २० २ २३पुणे कॅन्टोन्मेंट १४ १ २०कसबापेठ १४ ७ २०एकूण ३५० ६५ ४८८