पुणे : ह्याला विजयाचा आत्मविश्वास म्हणावं की 'अति'आत्मविश्वास..पण हे घडलं आहे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात..मतदान प्रक्रिया संपवून काही तासच उलटले असताना या उमेदवारांनी आणि निकालाला अजून २ दिवस शिल्लक आहे . मात्र, या दोन ' माननीय' उमेदवारांच्या समर्थकांनी चक्क आपापल्या नेत्यांच्या विजयाचे फ्लेक्स लावत आणि मिरवणूक काढत जोरदार आताषबाजी केली आहे.त्या 'माननीय' स्वयंघोषित विजयी उमेदवारांची नावे खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील कांबळे. अशी आहेत. ही ''आगाऊ '' फ्लेक्स बाजी पाहून चर्चांना उधाण आले नसते तरच नवल..
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 22:32 IST
pune election 2019 : ही ''आगाऊ '' फ्लेक्स बाजी पाहून चर्चांना उधाण आले नसते तरच नवल..
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष
ठळक मुद्देमहाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी सर्वत्र मतदान झाले.आश्चर्याचा झटका देणारा प्रकार पुण्यात झळकल्याने चर्चेचा विषय