शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Maharashtra Election 2019 : वंचित कोणाला करणार आमदारकीपासून ''वंचित ''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 7:00 AM

भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत वंचित विकासनेही येथे चांगली मते मिळविली होती़...

ठळक मुद्देनगरसेवकांच्या नाराजीचा फटका बसेल? 

पुण्यातील शिवाजीनगर  मतदारसंघ हा युतीचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो़. येथे भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत वंचित विकासनेही येथे चांगली मते मिळविली होती़. झोपडपट्टी भाग भाजपाने गेल्या काही निवडणुकात आपल्याकडे वळविले होते़. आता तीच मते प्रामुख्याने वंचितकडे जात असल्याने ही मते कोणाला आमदारकीपासून वंचित करणार असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे़.  या मतदारसंघातील सर्व नगरसेवक भाजपाचे आहेत़. ही भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू असायला हवी होती़. मात्र, या नगरसेवकांच्या कामाविषयी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे़. त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे़. काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची नागरिक सध्याच्या भाजपा नगरसेवकांशी करताना दिसतात़. त्याचाही फटका बसू शकतो़. पक्षांतर्गत विरोधही दिसतो़.दुसरीकडे भाजपाने निवडणुक सुरु झाल्यानंतर शहरातील सर्वात मोठी मेगाभरती शिवाजीनगरमध्ये घडवून आणली़. काँग्रेसबरोबरच शिवसेनेतील नेते, कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घेतले़. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे़. दुसरीकडे काँग्रेसमधून माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक जण गेल्याने नेते, कार्यकर्त्यांची उणीव जाणवत आहे़ सध्या काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हिरीरीने पुढे असल्याचे दिसते़ दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांना मतदारसंघातील झोपडपट्टी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे़. पूर्वी काँग्रेसचा असलेला हा मतदार भाजपाकडे गेला होता़. तो आता वंचितला प्रतिसाद देत असल्याने त्याचा किती फटका भाजपाला बसणार यावर येथील लढत किती रंगणार हे दिसून येईल़. 

नगरसेवकांच्या नाराजीचा फटका बसेल? भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात नागरिकांचे आंदोलन झाले होते़. तसेच पाणी व अन्य महापालिकेशी संबंधित प्रश्नांवरुन नागरिक नगरसेवकांना नाराज आहेत़. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर आहे, त्या कार्यकर्त्यांच्या बळावर ते लढत देत आहे़. 

टॅग्स :Puneपुणेshivajinagar-acशिवाजीनगरElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019