Maharashtra Election 2019 : इतकी वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही कमळाचा आधार का घ्यावा लागतो..? अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 07:56 PM2019-10-15T19:56:50+5:302019-10-15T20:02:41+5:30
... तर इतकी वर्षे काय केले?
कळस : १९ वर्षे मंत्रिपद मिळाल्यानंतरही एखाद्या माणसाला कमळाचा आधार घ्यावा लागत असेल, तर इतकी वर्षे काय केले? असा प्रश्न कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना जाहीर भाषणातून विचारला. त्यांच्यावर टीकेची झोड उठविताना यंदा इंदापूरातच नव्हे तर राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, दशरथ माने, जगन्नाथ मोरे, डॉ शशिकांत तरंगे, अॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, भरतराजे भोसले उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, कितीही झालं तर कमळ हे चार पेपरातच गुंडाळलं जातं. राखणदार नेमायचा असेल तर दुसºयाच्या घरात चोरी केलेल्याला आपण नेमतो का? मग, मेगा भरतीचे महापोर्टल करण्याचे काम त्या कंपनीला देण्यात आले. ज्या कंपनीचे काम मध्य प्रदेशमधील घोटाळ्यात ब्लॅक लिस्ट झाले होते. म्हणजे मेगा भरती होणारच नव्हती हे स्पष्टच होते. काय झाले मेगा भरतीचे? असा प्रश्न उपस्थित करुन अमोल कोल्हेंनी भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
सत्ताधारी भाजपा सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेला शेती व्यवसाय देशोधडीला लावला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, निर्णयाचे भांडवल करून भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. राज्यात तत्त्वत: कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात उद्योग, रोजगार निर्माण करून शेतकऱ्यांच्या मालाला समाधानकारक भाव मिळवून देईन, अशी आश्वासने भाजपा सरकारने दिली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत ते सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, या निष्क्रिय सरकारला घरी बसवा. तालुक्याच्या उज्वल भवितव्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाची जाण असऱ्या भरणे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी भरणे यांनी म्हणाले की, बँकेचे अधिकारी, संस्थाचे अध्यक्ष, सचिव यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी पण जशाच तसे उत्तर देईल. बँक ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या ताब्यात आहे. ज्या संस्थाना केडर सचिव नको असेल त्यांना बाहेर पडून नविन सचिव नेमणूक करण्यास परवानगी दिली जाईल.
———————————