पुणे : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते...अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतो बाबा , जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा, गप बसा, याच तर नुसतं उर भरून आलंय .. त्याला काय करू काय नाय ..तू आता २०१९ ला कसा आमदार होतोय तेच बघणार आहे.. हे वाक्य आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे विजय शिवतारे यांना लक्ष्य केले होते. पुरंदर चा आजच्या निकालात काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवतारेंचा २५ , ००० मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेली धमकी खरी करून दाखवली आहे. पुरंदरमध्ये मतमोजणीला सुरुवात केल्यावर शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना दिलेली धमकी खरी ठरताना दिसत आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप 1366 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे पिछाडीवर पडले आहेत. पुरंदर लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या. त्यावेळी पुरंदरमध्ये मिळणाऱ्या मताधिक्क्यावरुन शिवतारे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी 'विधानसभेला कसा निवडून येतो तेच बघतो', अशा शब्दांत अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यांमध्ये पवारांचा हा इशारा खरा ठरताना दिसत आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : अजित पवारांनी करून दाखवलं.! शिवसेनेच्या ''विजय'' ला आमदारकीपासून रोखलं !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 1:21 PM