महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 06:38 PM2019-10-24T18:38:19+5:302019-10-24T19:13:33+5:30

Pune Election result 2019 : बारामतीत अजित पवार  १ लाख ९३ हजार ५०५  अशा भरघोस मतांनी विजय..

Maharashtra Election result 2019 : Ncp beat bjp and shivsena on many seats in the pune district | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

googlenewsNext
ठळक मुद्देअटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव,शिवसेनेचे विजय शिवतारे पराभूत, गोपीचंद पडळकरांचे डिपॉझिट जप्त

पुणे :  जिल्ह्यात राष्ट्रवादीने १० पैकी ७ जागांवर विजय मिळवत दमदार कमबॅक केले आहे. बारामतीत अजित पवार  १ लाख ९३ हजार ५०५  अशा भरघोष मतांनी विजय मिळवत भाजपे गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त केले. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांनीही मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर इंदापुर तालुक्यात अटीतटीच्या लढतील दत्ता  भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणला. पुरंदर तालुक्यात काँगे्रसचे संजय जगताप यांनी शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा पराभव करून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. खेड, आंबेगांव, जुन्नर, शिरूर, मावळ तालुक्यातही राष्ट्रवादीच्या उमेवारांनी विजय मिळत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केला. 


जिल्ह्यात अतीतटीच्या लढतीत महायुतीला धक्का देत राष्ट्रवादी काँगे्रस काँगे्रसच्या महा आघाडीने बाजी मारली. जिल्ह्यातील अनेक मतदार संघात धक्कादायक निकाल लागले. पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांचा पराभव करत अजित पवार यांंनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला. जुन्नर तालुक्यात झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी शिवसेनेचे शरद सोनवणे यांचा पराभव केला. सुरवतीपासूनच बेनके यांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांना ७४ हजार ९५८ मते मिळवत सोनवणे यांचा पराभव केला. सोनवणे यांना ६५ हजार ८९० मते मिळाली. तर आशा बुचके यांना ५००४१ हजार मते मिळाली. तालुक्यातील मतविभाजनाचा फायदा बेनके यांना मिळाला. 
 आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवत आंबेगाव तालुका हा राष्ट्रवादीच काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. मंचरचे माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांचा दारूण पराभव केला. वळसे पाटील यांना १ लाख २६ हजार १२० मते मिळाली तर बाणखेले ५९ हजार ३४५ मते मिळाली. ६६ हजार ७७५ मतांनी बाणखेले यांचा पराभव झाला.

खेड तालुक्यात भाजप बंडखोराचा फटका शिवसनेला बसला. याचा फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांना मिळाला. मोहिते पाटील यांनी शेवटी निवडणुक म्हणून भावनिक केली होती. मतदारांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.  दिलीप मोहिते पाटील यांना ९६ हजार ८६६ मते मिळाली. शिवसेनेचे सुरेश गोरे यांना ६३ हजार मते मिळाली तर अतुल देशमुख यांना ५३ हजार ८७४ मिळाली. निवडणुकीच्या आधी मोहिते पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चाकणला झालेल्या हिंसाचारात मोहिते यांना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मोहिते त्यातून बाहेर पडले. याचा फायदाही मोहिते यांना काही अंशी झाला. 
 

शिरूर तालुक्यात अ‍ॅड. अशोक पवार यांनी सुरवातीपासूनच निवडणूकीची तयारी केली होती. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांशी जनसंपर्क वाढवीला. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदिप कंद, आणि मंगलदास बांदल यांच्या भाजपप्रवेशाचा फारसा परिणाम झाला नाही. पाचर्णे यांच्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो घेतला. मात्र, शिरूच्या मतदारांनी  पाचर्णे यांना नाकारत आमदारकीची संधी पवार यांना दिली. अ‍ॅड अशोक पवार यांनी १ लाख ४४ हजार २९३ मते मिळवत पाचर्णे यांचा तब्बल ४१ हजार ५०० मतांनी पराभव केला. बाबुराव पाचर्णे यांना १ लाख ३ हजार ८९ मते मिळाली.
 

भोर विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना १०८९२५ मते मिळवत विजयाची हॅटट्रीक केली आहे़ .शिवसेना-भाजप युतीचे उमदेवार कुलदी कोंडे यांना ९९७१९ मते मिळाली असून ९२०६ मतांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे़ दरम्यान, गतवेळच्या तुलनेत थोपटे यांच्या मताधिक्य निम्म्याने घटले आहे़. 
 

पुरंदर मतदार संघातपुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची हॅट्रीकची संधी हुकवली.  जगताप याना १ लाख ३० हजार ३२२ मते मिळाली तर शिवतारे याना ९९हजार १७ मते मिळाली आहेत. तालुक्यात शिवतारे यांच्या विरोधात जनमत तयार झाले होते. तालुक्यातील रोजगार आणि पाण्याचा प्रश्न दोनदा संधी मिळूनही सोडवता न आल्याने या वेळी मतदार राजाने त्यांना नाकारले.

इंदापुर तालुक्यात चुरशीच्या लढतील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव
इंदापुर तालुक्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. इंदापुर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले होते. यामुळे चुरस होणार हे ठरले होतेच. मतमोजणी सुरू झाल्यानंतर भरणे आणि पाटील यांच्यात आघाडी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. भरणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. सुरवातीलाच जवळपास १० हजारांच्या वर आघाडी मिळवत विजयाकडे घौडदौंड सुरू केली होती. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्पात पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र, भरणे यांनी ही आघाडी तोडत पुन्हा मुसंडी मारली आणि वियज मिळवीला.

दौंड तालुक्यात केवळ ६१५ मतांनी कुल यांचा विजय
दौंड  तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांनी राहुल कुल यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण केले. मतमोजणी सुरू झाल्यापासून कुल यांनी आघाडी मिळवली होती. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्यात त्यांना ही आघाडी राखता आली नाही. कुल यांना १ लाख ३ हजार ६६४ मते मिळाली. तर रमेश थोरात यांना १ लाख २ हजार ९१८ मते मिळाली. थोरात यांचा केवळ ७४६ मतांनी पभाभव पत्करावा लागला. 


शरद पवार यांचा फॅक्टर ठरला महत्वाचा
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रणनीतीचा फॅक्टर महत्वाचा ठरला. प्रचार काळात जवळपास सर्वच जिल्हा शरद पवार यांनी पिंजुन काढला. विविध ठिकाणी घेतलेल्या सभा याचा चांगला प्रभाव मतदारांवर पडला. यामुळे याचा फायदा महाआघाडीच्या बहुतांश उमेदवारांना मिळाला. 
 

राष्ट्रवादीचा बारामतीचा गड अभैद्यच
बारामतीत अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक मते मिळवत त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार विरोधी गोपीचंद पडळकर यांचा दारूण पराभव केला. पडळकर यांची अनामत रक्कमही जप्त झाली. अजित पवार यांना १लाख ९३ हजार ५०५  येवढी विक्रमी मते मिळाली. भाजपचे उमेदवार गोपींचद पडळकर यांना ३० हजार ७६ मते मिळाली. पवार यांनी विक्रमी मताधिक्कय मिळवुन कोणीही येवो ‘बारामती आमचीच’ असा संदेशच त्यांच्या विरोधकांना दिला आहे. या निवडणुकीत प्रथमच पवार यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हणुन संबोधलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वच विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त  होण्याची नामुष्की ओढवली आहे. आज जाहीर झालेल्या निकाल्याने राष्ट्रवादीचे माहेरघर समजला जाणारा बारामतीचा गड अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले आहे.


पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार

गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात दोन ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले होते.  शिवसेनेचे पुरंदरचे आमदार यांना जलसंपदा राज्यमंत्री पदही मिळाले होते. मात्र, असे असतांनाही त्यांना त्यांच्या तालुक्याचे प्रश्न सोवडता आले नाही. यामुळे या वेळी पुरंदर तालुक्यातून त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड-आळंदी मतदार संघातून २०१४ ला शिवसेच्या तिकिटावर सुरेश गोरे यांनी दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, या वेळी भाजपचे अतुल देशमुख यांच्या बंडखोरीचा फटका गोरे यांना बसला. मोहिते पाटील यांनी गोरे यांचा पराभव केला. गोरे यांना  केवळ ६३ हजार मते मिळाली.

जुन्नर तालुक्यातही शिवसेनेला फटका बसला. २०१४ ला मनसेचे एकमेव आमदार म्हणून शरद सोनवणे जुन्नरमधून निवडणुक आले होते. मात्र, त्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला. याला शिवसेनेच्या गेल्यावेळसेच्या उमेदवार आशा बुचके यांनी विरोध केला. यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले. यावेळी त्यांनी अपक्ष अर्ज भरत निवडणूकीत उभ्या राहिल्या. याचा फटका सोनवणे यांना बसला आणि ते पराभूत झाले. या निवडणूकीत शिवसेनेला एकही उमेदवार निवडणूक आणता आला नाही. 

Web Title: Maharashtra Election result 2019 : Ncp beat bjp and shivsena on many seats in the pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.