पुणे : शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीने रंगलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यावर विजय मिळविला़. शेवटच्या फेरीत शिरोळे यांचा विजय साकारला़. भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना ५८ हजार ७२७ मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ५३ हजार ६०३ मते मिळाली़ सिद्धार्थ शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय झाला़ .मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन फेरीमध्ये दत्ता बहिरट यांनी मामुली ५४२ मतांची आघाडी घेतली. होती़. यावेळी वंचितचे अनिल कुºहाडे यांना १२३१ मते मिळाली होती़. चौथ्या फेरीत खडकी, बोपोडी भागात सिद्धार्थ शिरोळे यांना २०७८ मते मिळाली़. तर दत्ता बहिरट यांना १४८५ मते मिळाली़ त्याचवेळी वंचितचे अनिल कुºहाडे यांना १२१३ मते मिळाले़ त्यामुळे शिरोळे यांनी बहिरट यांची आघाडी कमी करण्यास सुरुवात केली़. औंध गावात ५ व्या फेरीत अखेर शिरोळे यांनी २ हजार ४९० मतांची आघाडी घेतली होती़. ६ व्या फेरीत दोघांनाही जवळपास सारखी मते मिळाली़ ७ व्या फेरीत शिरोळे यांची आघाडी वाढली़. पुढच्या ८ व ९ व्या फेरीत घेतली. त्यानंतर १३ व्या फेरीत शिवाजीनगर गावठण भागात दत्ता बहिरट यांनी पुन्हा एकदा अधिक मते मिळवत धक्का देत शिरोळे यांची आघाडी कमी केली़. पुढच्या १४ व्या फेरीत पुन्हा शिरोळे यांना मॉडेल कॉलनी या पारंपारिक भागात ११५० मतांची आघाडी मिळाली़ व त्यांनी आपले लीड ५ हजार ७४४ मतांपर्यंत वाढविले़.१८ व्या फेरीत दत्ता बहिरट यांनी पुन्हा आघाडी घेत शिरोळे यांना मागे टाकले़. १८ व्या फेरीअखेर दत्ता बहिरट यांना १७३ मतांची आघाडी होती़. मात्र, पुढील दोन फेºया या भाजपाचा हार्डकोर मतदार असलेल्या आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोडवरील मतमोजणी बाकी असल्याने व तेथे नक्कीच आघाडी मिळण्याची निश्चिती असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी नि: श्वास सोडला तर, दुसरीकडे कॉंग्रेस कार्यकर्ते निराश झाले़.१९ व्या व २० व्या फेरीत अपेक्षेप्रमाणे भाजपाला एकूण मतांपैकी ७० ते ७५ टक्के मते मिळाल्याने शिरोळे यांचा ५ हजार १२४ मतांनी विजय साकारला़. टपाल मतदानात दत्ता बहिरट यांना १६३ तर सिद्धार्थ शिरोळै यांना १३६ मते मिळाली़ .
..........
गोखलेनगर, दीपबंगला, पांडवनगर या भागातील १५, १६, १७ व्या फेरीत दत्ता बहिरट यांनी आघाडी घेत शिरोळे यांना जोरदार धक्का दिला़ १७ व्या फेरी अखेर शिरोळे यांच्याकडे केवळ १७९ मतांची आघाडी राहिली होती़. या भागात दत्ता बहिरट यांना मोठी आघाडी अपेक्षित होती़. या फेरीत प्रामुख्याने वडारवाडी, हेल्थ कॅम्प भागातील मतदान होते़ त्याच ठिकाणी वंचितचे अनिल कुऱ्हाडे यांना चांगलीच मते मिळाली़ १६ व्या फेरीत शिरोळे यांना २४९४ तर कुºहाडे यांना ११७ मते, १७ व्या फेरीत शिरोळे यांना केवळ १७८८ मते मिळाली त्याचवेळी कुऱ्हाडे यांना १७६४ मते होते़ यामुळे दत्ता बहिरट यांना या फेरीत आघाडी मिळाली तरी ते अपेक्षित आघाडी मिळू शकली नाही़.
...........
भाजपाचा बालेकिल्ला असतानाही कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी दिलेल्या जोरदार लढतीमुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चुरस अखेरच्या फेरीपर्यंत रंगत गेली़.कुऱ्हाडे मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण या भागाने काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले असताना भाजपाची शेवटची आशा असलेल्या भांडारकर रोड, प्रभात रोड या भागाने शेवटच्या २० व्या फेरीत तब्बल ७५ टक्के मते दिल्याने सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय सुकर होऊ शकला़. वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुºहाडे यांनी काँग्रेसला आघाडी मिळालेल्या बोपोडी, वडारवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मते खेचल्याने दत्ता बहिरट यांच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला़.