पुणे : व्यापारी धोरण पुढे नेण्यासाठी गुजरात राज्याकडे पाहिले जात होते. सध्या देशाचे नेतृत्व गुजरात करत आहे. यामुळे देशाचे व्यापारी धोरण निश्चित केले जाईल, असा विश्वास व्यापाऱ्यांना होता. परंतु भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला असून, व्यापारी धोरणाकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुकुंदनगर येथे व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. मेळाव्यासाठी माजी खासदार रजनी पाटील, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, विठ्ठल मणियार, सराफ असोसिएशनचे फत्तेचंद रांका, राजेश शहा, राजेश फुलफगर, जॉगरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुगळे आदी उपस्थित होते.सद्यस्थितीत अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम देशावर होत आहेत़. एकेकाळी आपण गाड्या आयात करायचो; मात्र निर्यात करू लागलो़. सध्या याच क्षेत्रात प्रचंड मंदी आहे़. मंदी घालवण्यासाठीपावली टाकावी लागतात़. उद्योजकांमध्ये गुंतवणुकीचे वातावरण निर्माण केले पाहिजे़. मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.प्रफुल्ल पटेल केंद्रीयमंत्री असताना त्यांनी उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर विमानांची जेट कंपनी बंद पडली़ .त्यामुळे २० हजार लोकांची नोकरी गेल्याचेही पवार यांनी नमूद केले.या वेळी वालचंद संचेती, राजेश शहा, फत्तेचंद रांका यांनी व्यापाºयांना भेडसावणाºया समस्या मांडल्या़ काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश फुलफगर यांनी आभार मानले़........सध्या निर्माण झालेल्या आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने समाजातील विविध क्षेत्रांतील घटकांशी संवाद ठेवला पाहिजे. अरुण जेटली मंत्री होते तोपर्यंत हा संवाद टिकून होता, पण आता सरकार आणि व्यापारी असा काही संवादच राहिलेला नाही. भाजप सरकारमध्ये आमचाच संवाद होत नाही, तर व्यापारी, उद्योजकांचा कधी होणार, असा उपरोधिक टोलादेखील पवार यांनी लावला. गेल्या पाच वर्षांत शेती, व्यापार, उद्योगासह विविध क्षेत्रांतील प्रश्न गंभीर बनत चालले असल्यानेच १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशीच परिस्थिती उद्योग क्षेत्रात निर्माण झाली आहे़. या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस