शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:35 AM

''मंत्रिपद मिळाल्यानंतर काम करालच; पण त्या कामांची नांदी ‘गडकरींचा पुतळा बसवून करा...''

ठळक मुद्देचित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांचा मेळावा

पुणे : ‘‘आम्हा नटांचा देव असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडण्यात आला. तेव्हा केंद्र, राज्य आणि महापालिकेत आपलंच सरकार होतं. मग पक्षाने काय केले,’’ असा सवाल विचारत अभिनेता-लेखक मिलिंद शिंत्रे यांनी कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना निरुत्तर केले. ‘‘मंत्रिपद मिळाल्यानंतर काम करालच; पण त्या कामांची नांदी ‘गडकरींचा पुतळा बसवून करा’,’’ असेही या वेळी सुनावण्यात आले.चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांचा मेळावा सोमवारी (दि. १४) मनोहर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर कलाकारांनी आपल्या मागण्या मांडताना मिलिंद शिंत्रे यांनी ‘राम गणेश गडकरी’ यांच्या पुतळ्याचा मुद्दा छेडला. ‘‘प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर कलाकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही आपलीच सत्ता होती, मात्र सत्ताधाºयांकडून संभाजी बागेत अजूनही गडकरींचा पुतळा बसविण्यात आलेला नाही,’’ असेही मिलिंद शिंत्रे म्हणाले. कोथरूडमध्ये जागतिक दर्जाचे नाट्यगृह उभारायचं; पण त्यापूर्वी गडकरींच्या पुतळ्याची आमची मागणी पूर्ण करा, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली. .........‘‘सांस्कृतिक क्षेत्रात जे काही केले. त्यात काहीसे कमी पडलो,’’ अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र गडकरी प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. दरम्यान, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही सर्व ऐतिहासिक पुरावे असूनही, दादाजी कोंडदेव यांचा हटविलेला पुतळा पुन्हा बसविला नाही, यावरही बोट ठेवले. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा