भूगाव : येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगावकर आणि मुळशीकर अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी केवळ ४५ दिवसांचा अवधी दिलेला असला तरी स्पर्धेच्या दोन दिवसांपूर्वीच सर्व नियोजन झालेले असेल, अशी माहिती स्पर्धेच्या संयोजकांनी दिली.या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात भूगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांतारामदादा इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजीअप्पा तांगडे, राहुल शेडगे, स्वस्तिक चोंधे, अनिल पवार, कैलास चोंधे, कालिदास शेडगे, संदीप तांगडे, योगेश भिलारे, नितीन तांगडे, कालिचरण शेडगे, रमेश सणस, प्रदीप चोंधे, जितेंद्र इंगवले, बाजीराव खाणेकर, विशाल सुर्वे आदी उपस्थित होते.स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. १९) सायंकाळपासून मल्लांची वजने घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर गटनिहाय लॉट्स पाडले जातील. बुधवारी (दि. २०) कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची भूगावमध्ये जय्यत तयारी; विनोद तावडे करणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 6:06 PM
भूगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगावकर आणि मुळशीकर अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
ठळक मुद्देस्पर्धेसाठी मंगळवारी (दि. १९) सायंकाळपासून मल्लांची वजने घेण्यास करण्यात येणार सुरुवात क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन