पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले हाेते. अखेर मुहूर्त लागला असून, शुक्रवारी (दि. २) दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पाहता येणार आहे. कोकण विभागाची टक्केवारी जास्त म्हणजे 98.11 टक्के तर नागपूर विभागाची टक्केवारी कमी 92.05 टक्के आहे. तर यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ एवढी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची (Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023) परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर खालील संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
एकूण निकाल - ९३.८३ टक्के
परीक्षेला बसलेले विद्यार्थी - १५ लाख २९ हजार ०९६
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी - १४ लाख ३४ हजार ८९८
मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी - ९५.८७ टक्के
मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी - ९२.०५ टक्के
कोकण विभाग अव्वल - ९८.११ टक्के
नागपूर विभाग विभाग - ९२.०५ टक्के