पुणे - महाराष्ट्र ऑप्थोमॉलॉजी आणि पुना ऑप्थोमॉलॉजी सोसायटीच्या वतीने मॉस्कॉन या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेचे शुक्रवारी ( १३ ऑक्टोबर) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सेनापती बापट रस्त्यावरील जे.डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता ही परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
परिषदेच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधुरी कानिटकर, महाराष्ट्र ऑप्थोमॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. परिक्षित गोगटे उपस्थित राहणार आहेत. परिषदेदरम्यान नेत्ररोग क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या पुण्यासह महाराष्ट्रातील नेत्रतज्ज्ञांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांहून अधिक नेत्रतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पूना ऑप्थोमॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष आणि परिषदेचे चेअरमन डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.