पुणे : राज्यात पुढील तीन-चार दिवस पावसासाठी पोषक हवामान असून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने उद्या शुक्रवारी (दि. ५) विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच कोकणामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालाही येलो अलर्टचा इशारा आहे. मराठवड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. ६) आणि रविवारी (दि.७) संपूर्ण विदर्भामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे येथे जोरदार पाऊस होईल. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
राज्यातील गुरुवारचा पाऊस
पुणे : ०.२ मिमी
जळगाव : ९ मिमी
महाबळेश्वर : १७ मिमी
सांगली : ०.१ मिमी
सातारा : ०.४ मिमी
मुंबई : ०.८ मिमी
अलिबाग : ७ मिमी
रत्नागिरी : ३ मिमी
अमरावती : १ मिमी
गोंदिया : ३ मिमी