शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Maharashtra Rain: राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; अमरावतीला रेड अलर्ट

By श्रीकिशन काळे | Published: September 15, 2023 8:10 PM

येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे...

पुणे : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि.१६) व रविवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट सांगितला आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे.

देशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेश व लगतच्या भागावर आहे. येथून एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. त्यामुळे उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ महाराष्ट्र येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे राज्यात कोकण, गोवा, घाट माथ्यावर मुसळधारचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोव्यात, १६ व १७ सप्टेंबरला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. पुढील पाच दिवस राज्यात आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच पुणे व परिसरात पुढील सात दिवस ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे. तर १६ व १७ सप्टेंबर रोजी घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.

रेड अलर्ट : अमरावती

ऑरेंज अलर्ट : नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अकोला

राज्यातील पाऊस (मिमी)जळगाव : ६

महाबळेश्वर : १कोल्हापूर : ०.३

नाशिक : ०.४छत्रपती संभाजीनगर : ५

अकाेला : ०.६अमरावती : १४

बुलढाणा : ०१गोंदिया : १३

नागपूर : १५

राज्यात उद्या (दि.१६) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४,५ दिवस तीव्र पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.- के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती