- किरण शिंदे
पुणे : भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन उत्तम खंदारे यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर), महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी 2012 पासून वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भादविक 376, 377, 406, 420, 506 (2) आणि 34 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संभोग-
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाची आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भाषण चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संभोग केला. फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जीवे मारण्याची धमकी-
या संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वाटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.