शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'

By प्रशांत बिडवे | Published: May 27, 2024 11:31 AM

Maharashtra SSC 10th Result 2024 : यंदा  दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा  दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी  सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या.दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर मंडळाचा ९४.७३ टक्के एवढा लागला आहे. दुसरा क्रमांक कोल्हापूर ९७.४५, पुणे  ९६.४४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई- ९५.८३, अमरावती- ९५.५८, नाशिक ९५.२८, लातूर ९५.२७, छत्रपती संभाजीनगर ९५.१९ या मंडळाचा क्रमांक लागतो. 

राज्यातील ९ हजार ३८२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी लातूर मंडळातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के  तर मुले ९४.५६ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.६५ टक्के जास्त आहे. 

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दि.१ ते २६ मार्च या कालावधीत ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थ्यांसह ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता.  

विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रात्यक्षिक आणि मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीट ऐवजी ऑनालाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर भरल्याने निकाल सुमारे एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे मंडळाला शक्य झाले आहे.  

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल :

१. https://mahresult.nic.in 

२. http://sscresult.mkcl.org 

३. https://sscresult.mahahsscboard.in 

४. https://results.digilocker.gov.in 

छायाप्रत, गुणपडताळणी साठी २८ मे पासून करा अर्ज गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी दि. २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये श्रेणी/ गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देता येणार आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल