लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीनगर येथे होणाऱ्या १७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमधून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. पुण्याची आयुषा इंगवले महिला संघाचे, तर मुंबईचा विशाल जाधव पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. ५) स्पर्धा सुरू होणार आहे.
ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सहसचिव रवींद्र सोनवणे, जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव दीपक आर्डे, खजिनदार कृपालसिंह ठाकूर, शेखर पोळ, विजय पळसकर, विठ्ठल शिरगावकर यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
शुक्रवार, दिनांक ५ मार्च ते सोमवार, दिनांक ८ मार्च या दरम्यान स्पर्धा होणार आहे. प्रा. अमोल पाटील हे संघाचे प्रशिक्षक तर राकेश पाटील संघ व्यवस्थापक असतील.
चौकट
महाराष्ट्राचा संघ-
पुरुष - विशाल जाधव, ऋतुराज सुवर्णकार, राहुल उगलमुगले, घनश्याम कोळी, वीर जैन, जयवंत मदणे, संदीप व्यवहारे, कल्पेश वंजारी.
महिला- मेघना नाईक, पौर्णिमा चव्हाण, निकिता भोई, स्नेहल पाटील, प्रतीक्षा शेरकर, प्रेरणा देशमुख, आयुष इंगवले.