Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:25 PM2024-11-22T13:25:16+5:302024-11-22T13:32:16+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या समोर येणार आहेत, त्याआधीच पुण्यात अजित पवार यांचे मुख्यमंत्रि‍पदाचे फलक लागले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar's chief minister banner was first put up, but it was removed shortly, why? | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या २० नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी याबाबत उद्या चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुख्यमंत्रिपदाचे पुण्यात फलक लावण्यात आला आहे. पण, काही वेळातच हे फलक काढण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट

पुण्यात राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते.या बॅनरवर 'विकासाचा वादा अजितदादा, मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असं लिहिण्यात आले होते. राजकीय वर्तुळात या बॅनरची चर्चा जोरदार सुरू होती. दरम्यान, आता हे बॅनर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र, आता निवडणुकीचे निकाल येण्यास काही तास बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रि‍पदाची फलक लावली जात आहेत.

पुण्यात लावण्यात आलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता हे पोस्टर हटवण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

उद्या निकाल येणार

या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यात जोरदार प्रचार केला. महायुतीने लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांचा प्रचार केला. तर महाविकास आघाडीने महागाई, शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न, नव्या योजनांची घोषणा केल्या. दोन्ही बाजूंनी मोठी लढत दिली.

या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या निवडणुकीत राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. वाढलेल्या मतदानाची टक्केवारीमुळे उद्या २३ तारखेला येणाऱ्या निकालाची देखील चुरस वाढली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar's chief minister banner was first put up, but it was removed shortly, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.