Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:13 PM2024-11-18T17:13:15+5:302024-11-18T17:17:30+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीची सांगता सभा होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Where the old man wanders, there the good grows Discussion of the banner in the hands of Pratibha Pawar in Baramati | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा बंद होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर दिवशी मतमोजणी होणार आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेतील एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

बारामती येथील सांगता सभेत कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना एक बॅनर दिले. या बॅनरवरील मजकूराची जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनरवर  'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय' असा मजकूर आहे.  हा मजकूर खासदार शरद पवार यांच्याबाबत आहे. 

“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

युगेंद्र पवार यांच्यासाठी आज बारामतीमध्ये सर्व पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सांगता सभेत प्रतिभा पवार यांनी सर्वांच विशेष लक्ष वेधून घेतले. प्रतिभा पवार यांना कार्यकर्त्यांनी एक फलक दिला. हा फलक घेऊन पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले. या फलकावर 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय' असं लिहिलं आहे. या फलकाने सभेत सर्वांच लक्ष वेधून घेतलं. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत दिसत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. यामुळे या मतदारसंघावर देशाचे लक्ष लागले आहे. खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघात जारदार प्रचार केला आहे, तर अजित पवार यांनीही गांवांना भेटी देत प्रचार केला आहे.  

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Where the old man wanders, there the good grows Discussion of the banner in the hands of Pratibha Pawar in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.