Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:32 PM2024-11-01T18:32:22+5:302024-11-01T18:32:52+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार पाडव्यानिमित्त काटेवाडीत कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तर शरद पवार गोविंद बागेत भेटणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : पवार कुटुंबीय प्रत्येकवर्षी दिवाळीत बारामतीमधील गोविंदबागेत एकत्र येत येतात. खासदार शरद पवार यांच्या कुटुंबीयांची ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहेत. पण आता या वर्षी पाडव्यानिमित्त अजित पवार गोविंदबागेत नसून काटेवाडीत असणार कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यामुळे आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीमधील पाडवाही दोन ठिकाणी साजरा केला जाणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पवार कुटुंबात खरच फूट पडली आहे का? अशा चर्चा सुरू आहेत, दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचे कारण सांगीतले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती येथील गावांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजित पवार यांनी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याबाबतही भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,एका ठिकाणीच गर्दी जास्त होते. ताटकळत थांबावं लागतं, लोकांच्या सोयीकरता काटेवाडीला पाडव्याला कार्यकर्त्यांना भेटणार आहे. एकाच ठिकाणी असेल तेव्हा मागे एक, एक किलोमीटर रांग लागायची. त्यामुळे लोक त्रासून जायची. गर्दी कमी करण्यासाठी हे केलंय, पूर्वी आम्ही पाडवा काटेवाडीलाच साजरा करत होतो, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात फिरत असताना लोकांच्यामध्ये उत्साह दिसत आहे. महिला ओवाळण्यासाठी थांबवत आहेत. मागे लोकसभा निवडणुकीत काही घडले त्याबाबत आम्ही त्यांना काही विचारत नाही. आम्ही बारामती तालुक्यात मोठी काम केली आहेत. यासाठी महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा आणायचे आहे, बाकीच्या योजना सुरू करायच्या आहेत, असंही पवार म्हणाले. बारामतीकरांनी मला पहिल्या निवडणुकीपासून माझ्यावर भरपूर प्रेम दिलं आहे. तरुणांच्या त आता उत्साह दिसत आहे.
बंडखोरीवर बोलताना अजित पवार म्हणाले, काल आम्ही बैठक घेतली. यावर आता तोडगा काढणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या पक्षातील कोणी कोणी अर्ज भरले आहेत, त्याची जबाबदारी कोणी कुठे घ्यायची हे ठरलं आहे. आज-उद्या -परवा सुट्टी आहे, शेवटचा दिवस चार तारीख आहे. मुंबईमध्ये आम्ही एकत्र येणार आहे, चार तारीखेला सकाळपासून ते फॉर्म मागे घेण्याकरिता आमची जबाबदारी आम्ही पार पडणार आहोत , असंही पवार म्हणाले.