शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:32 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार पाडव्यानिमित्त काटेवाडीत कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तर शरद पवार गोविंद बागेत भेटणार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : पवार कुटुंबीय प्रत्येकवर्षी दिवाळीत बारामतीमधील गोविंदबागेत एकत्र येत येतात. खासदार शरद पवार यांच्या कुटुंबीयांची ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहेत. पण आता या वर्षी पाडव्यानिमित्त अजित पवार गोविंदबागेत नसून काटेवाडीत असणार कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यामुळे आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीमधील पाडवाही दोन ठिकाणी साजरा केला जाणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पवार कुटुंबात खरच फूट पडली आहे का? अशा चर्चा सुरू आहेत, दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचे कारण सांगीतले आहे. 

जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती येथील गावांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजित पवार यांनी काटेवाडीत पाडवा साजरा करण्याबाबतही भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,एका  ठिकाणीच गर्दी जास्त होते. ताटकळत थांबावं लागतं, लोकांच्या सोयीकरता काटेवाडीला पाडव्याला कार्यकर्त्यांना भेटणार आहे. एकाच ठिकाणी असेल तेव्हा मागे एक, एक किलोमीटर रांग लागायची. त्यामुळे लोक त्रासून जायची. गर्दी कमी करण्यासाठी हे केलंय, पूर्वी आम्ही पाडवा काटेवाडीलाच साजरा करत होतो, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात फिरत असताना लोकांच्यामध्ये उत्साह दिसत आहे. महिला ओवाळण्यासाठी थांबवत आहेत. मागे लोकसभा निवडणुकीत काही घडले त्याबाबत आम्ही त्यांना काही विचारत नाही. आम्ही बारामती तालुक्यात मोठी काम केली आहेत. यासाठी महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा आणायचे आहे, बाकीच्या योजना सुरू करायच्या आहेत, असंही पवार म्हणाले. बारामतीकरांनी मला पहिल्या निवडणुकीपासून माझ्यावर भरपूर प्रेम दिलं आहे. तरुणांच्या त आता उत्साह दिसत आहे. 

बंडखोरीवर बोलताना अजित पवार म्हणाले, काल आम्ही बैठक घेतली. यावर आता तोडगा काढणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या पक्षातील कोणी कोणी अर्ज भरले आहेत, त्याची जबाबदारी कोणी कुठे घ्यायची हे ठरलं आहे. आज-उद्या -परवा सुट्टी आहे, शेवटचा दिवस चार तारीख आहे. मुंबईमध्ये आम्ही एकत्र येणार आहे, चार तारीखेला सकाळपासून ते फॉर्म मागे घेण्याकरिता आमची जबाबदारी आम्ही पार पडणार आहोत , असंही पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार