लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकोणिसाव्या ज्युनियर राष्ट्रीय वुशु स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली. हरियाणा येथील फतेहबाद येथे ही स्पर्धा झाली. हरियाणा वुशु असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुण्याच्या सलोनी जाधव हिने नॅनक्वॅन मध्ये २ रौप्य पदक आणि १ कांस्यपदक पटकाविले. स्वराज कोकाटे याने नॅनद्वू प्रकारात २ कांस्य पदकाची कमाई केली. तर ओमकार मोडक याने ताईजीजॅन मध्ये एक कांस्य तर सांगलीच्या सोनाली जाधव हिने रौप्य पदक पटकाविले. सलोनी जाधव, ओमकार मोडक, सुरज कोकाटे हे तीनही खेळाडू सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. स्पर्धेत भारतातील ३० राज्यांचे संघ आणि ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे संभाजी झेंडे, महासचिव सोपान कटके यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळ - एकोणिसाव्या ज्युनियर राष्ट्रीय वुशु स्पर्धेतील विजेते खेळाडू आणि सहभागी महाराष्ट्राचा संघ.