पुणे : हॉकी इंडिया अंतर्गत सातव्या कुमार महिला राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत हॉकी महाराष्ट्र संघाच्या महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना बाद फेरी गाठण्यास अपयश आले. हरयाणा येथील रोहतक क्रीडानगरी येथे झालेल्या या स्पर्धेत ड गटातून खेळणाऱ्या हॉकी महाराष्ट्र संघाने एक बरोबरी आणि एक विजय मिळवला. पण संघाला हॉकी ओडिशा आणि हॉकी हरयाणा संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. हॉकी महाराष्ट्र संघाने हॉकी हरयाणा संघाविरुद्ध २-२ अशी बरोबरी केली. महाराष्ट्र संघाकडून ऋतुजा पिसाळ हिने दोन गोल नोंदविले. तसेच हॉकी महाराष्ट्रला नगर हवेली हॉकी असोसिएशन संघाविरुद्ध पुढे चाल मिळाली. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राकडून ऋतुजा पिसाळ, पूजा बोरकर यांच्यासह भावना खाडे, स्वाती जाधव, प्रगती पानेवार यांनी उत्कृष्ट खेळ केला. संघाचे गोलरक्षक चैत्राली जुबेकर हिने उत्कृष्ट कामगिरी केली.‘ड’ गटामध्ये हॉकी महाराष्ट्र संघाने चार गुण झाले. हॉकी ओडिशा (१० गुण), हॉकी हरयाणा (८ गुण) व हॉकी भोपाळ (६ गुण) अशी गुणसंख्या झाली आहे.स्पर्धेचा निकाल: हॉकी महाराष्ट्र: २ (ऋतुजा पिसाळ ७, ४७ मि.) बरोबरी वि. हॉकी हरयाणा: २); हॉकी महाराष्ट्र: १ (पूजा बोरकर ३ मि. पेनल्टी) पराभूत वि. हॉकी भोपाळ: २; हॉकी महाराष्ट्र : ० पराभूत वि. हॉकी ओडिशा : १. (क्रीडा प्रतिनिधी)
महाराष्ट्र महिला संघ चौथ्या स्थानी
By admin | Published: April 27, 2017 5:08 AM