शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

महारेराचे कामकाज ३० जूनपर्यंत बंद राहणार : अपिलेट ट्रिब्युनल सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:01 PM

तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीचा अर्ज महारेरा सचिवांकडे त्यांच्या-ईमेल आयडीवर सादर करता येईल

ठळक मुद्देप्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाईन सुरू राहणार कार्यालयात होणारी गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महारेरा बंद राहणार

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन घोषित केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) कामकाज तोपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. अपिलेट ट्रिब्युनल सोमवारपासून (दि.8) सुरू झाले आहे. पुढील आदेश येईपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे सुरू असणार आहे. जे वादी-प्रतिवादी अंशत: सुनावणी अथवा अंतिम सुनावणी घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना अपिलेट ट्रिब्युनला आगाऊ कळवावे लागणार आहे. त्यानंतर त्यावरील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश बोराटे यांनी सांगितले.    गेल्या काही महिन्यापासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.देशात सुरुवातीला १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र,कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. त्यानंतर १७ मेपर्यंत, त्यानंतर३१ मेपर्यंत वाढविण्यात आला. आता ३० जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. याच धर्तीवर कार्यालयात होणारी गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महारेरा बंद राहणार आहे. मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाईन सुरू राहणार आहेत.  पाचवे लॉकडाऊन संपल्यानंतर शासनाच्या निदेर्शानुसार महारेराच्या कामकाज बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  बोराटे म्हणाले, बंदच्या कालावधीतही तातडीच्या प्रकरणे घेतली जाणार आहेत.       याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या पूर्ण खंडपीठाकडून घेतला जाईल. तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीचा अर्ज महारेरा सचिवांकडे त्यांच्या-ईमेल आयडीवर सादर करता येईल. महारेराने निकाल दिल्यानंतर त्या निकालविरोधात बिल्डर अथवा ग्राहकाने अपील केल्यानंतर अपिलेट ट्रिब्युनलमध्ये सुनावणी होत असते. ते सुरू झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Courtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस