शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

महासंग्राम उद्यापासून सुरू

By admin | Published: January 26, 2017 1:05 AM

राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी उद्या शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.

पुणे : राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी उद्या शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून याद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयानिहाय ठरवून दिलेल्या प्रभागांमध्ये सकाळी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच हजार रुपये, तर आरक्षित जागेवरील उमेदवाराला अडीच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत दोन शपथपत्रे सादर करावयाची आहेत. मालमत्तेसंबंधीचे विवरण आणि गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती अर्जासोबत जोडून द्यायची आहे. तसेच सन २००२ नंतर तीनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागणार आहे. खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे खर्चाच्या नोंदी कराव्या लागणार आहेत. एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करण्याची सवलत यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. आॅनलाइन उमेदवारी अर्ज कुठूनही भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, आॅनलाइन अर्ज भरण्यास उशीर करून शेवटच्या दिवशी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास त्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊन त्याची गती संथ होऊ शकते. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच उमेदवारी अर्ज भरावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे महापालिकेची कोणतीही थकबाकी नाही, याचा दाखला त्यांना द्यावा लागणार आहे. महापालिकेच्या एलबीटी विभागात अर्ज केल्यास संबंधित उमेदवाराकडे थकबाकी नसल्याचा दाखला उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरायचे असले तरी माघार घ्यायची असल्यास मात्र स्वत: उपस्थित राहून अर्ज करावा लागणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. एकाच पक्षाचे दोन उमेदवारांनी एबी फॉर्म सादर केल्यास ज्याचा पहिला फॉर्म आला असेल तो अधिकृत मानला जाणार आहे.