Mahashivratri 2022 : सुनेत्रा पवारांनी साकारली महादेवाची चक्क्याची पिंड, पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:28 PM2022-03-01T12:28:35+5:302022-03-01T16:24:19+5:30
सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून दहा मिनिटात चक्रेश्वर महादेव साकारले...
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरिता आल्या होत्या.
सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून दहा मिनिटात चक्रेश्वर महादेव साकारले. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरिता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. सुमारे 51 किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली आहे.
Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी चक्क्यापासून तयार केली शंकराची पिंड#sunetrapawar#ajitpawar#Mahashivratripic.twitter.com/sKhFVrjead
— Lokmat (@lokmat) March 1, 2022
यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, खजिनदार राजू बलकवडे, विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.