भीमाशंकर: ‘हर हर महादेव’ च्या जय घोषात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्र भरली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने व शासनाने निर्बंधामध्ये शिथीलता अणण्याने यावर्षी पहाटेच्या दर्शनाला जास्त गर्दी दिसली. रात्री १२ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली.
पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता शासकिय पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरुवात झाली. भीमाशंकरमधील दुकानदारांनी गर्दी होण्याचा अंदाज असल्याने माल भरला आहे.
महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, संजय गवांदे, पुरूषोत्तम गवांदे गुरूजी, मयुर कोडिलकर, आशिष कोडिलकर यांच्या वेदपठनात तसेच दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे, माऊली शिर्के इत्यादी गुरव मंडळींच्या उपस्थितीत शासकिय पूजा झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाशिवरात्र यात्रेनिमित्त भीमाशंकर देवस्थान टस्ट, पोलिस विभाग यांनी चोख तयारी केली आहे.