शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांचे नव्हे तर आरोपींना संरक्षण देणारे; चित्रा वाघ यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:16 PM

पुणे पोलीस बलात्का-यांची पिल्लावळ वाचवण्यात व्यस्त असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला

पुणे : रघुनाथ कुचिक प्रकरणात भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर केले. पिडितेला रुग्णालयात घेऊन जाणा-या राहूल बोरा या व्यक्तीने ‘सर्व यंत्रणा आमच्या हातात असून या केसचे पुढे काही होणार नाही’, असे मेसेज करत पिडितेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. वाघ यांनी मेसेजचे स्क्रीन शॉट वाचून दाखवत, बलात्कारी लोकांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. हे सरकार गोरगरिबांचे नसून, आरोपींना संरक्षण देणारे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

वाघ म्हणाल्या, ‘कुचिक प्रकरणात पोलिसांना सगळे पुरावे दिले असूनही ते आरोपीला पाठीशी घालत आहेत. पुणे पोलीस त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पुणे पोलीस बलात्का-यांची पिल्लावळ वाचवण्यात व्यस्त असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे.’

न्याय मिळेपर्यंत लढतच राहणार

गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असतील तर त्यांनी जरा या प्रकरणात लक्ष घालावे. बलात्काराचा गंभीर आरोप झाला असूनही सरकारला आपल्या पक्षातील नेत्याला राज्यमंत्री दर्जाच्या पदावरुन पायउतार करावेसे का वाटत नाही, असा सवाल वाघ यांनी केला. माझ्या चौैकशीचे आदेश देऊन दबाव निर्माण करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत लढतच राहणार. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नका, असा इशाराही त्यांनी दिला.

''न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आपल्या खिशात असल्याचे आरोपी आणि त्याच्या आसपासच्या लोकांना वाटत आहे. पिडितेला धमकी देण्याएवढी गुर्मी यांच्यात कोठून येते? कोणी कितीही प्रयत्न केले, तरी सत्य कधीच लपून राहत नाही. अशा व्यक्तीला चपलेने मारले पाहिजे. पुणे पोलिसांच्या वर्दीच्या आतमध्येही बाप दडलेला आहे. त्यांना पिडितेची दया येत नाही का? कोणी कितीही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तरी न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहील असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.''  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस