शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

महविकास आघाडीची सभा; हे कुणी सांगितलं? पुण्यातील सभेबाबत अजितदादांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 7:30 PM

पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे.

पुणे : पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस + शिवसेना तसेच डावे, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये राज्यपातळीवरील आणि शहरातील स्थानिक नेते सभेला संबोधित करणार आहेत. तसेच सर्व बडे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. 

 पवार म्हणाले, पुण्यामध्ये होणाऱ्या ३० तारखेच्या सभेच मी पहिल्यांदाच ऐकत आहे. हे तुम्हाला कुणी सांगितलं असा सवाल त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला आहे. तर ही गोष्टी कुणी पसरवली हे मला माहित नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व नेते अशा सभेबाबत निर्णय घेतात. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. पण यांच्याशिवाय अन्य कोणी नेता असेल तर त्यांचं नाव सांगा. मी त्यांना विचारतो असे त्यांनी सांगितले आहे. 

हा निर्धार या सभेमधून व्यक्त केला जाणार

''देशामध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामधून घटनेमध्ये अपेक्षित असलेल्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागत आहे. केंद्र सरकारची एक पक्षीय नोकरशाही व जुलूमशाही लादण्याचे उद्दीष्ट स्पष्टपणे दिसत आहे. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे करउत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा सुव्यवस्थेबाबतचे अधिकार तसेच नोकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्राची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता केंद्राची ही घटनाविरोधी दादागिरी सहन करणार नाही. हा निर्धार पुण्यात होणाऱ्या सभेमधून व्यक्त केला जाणार असल्याचे पुणे महाविकास आघाडीने सांगितले आहे.''  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे