बारामती: राज्याप्रमाणेच माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 'महाविकासआघाडी' पॅटर्न राबविण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.तसेच, काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांबरोबर बोलणार आहे. त्यांचा आग्रह नसेल,मात्र, त्यांचे ऐकण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले,पवारसाहेबांह्णनी आणि आपण पदांचा गैरवापर करुन कधी कोणाला त्रास दिलानाहि, कोणीही पुढे होवुन याबाबत सांगावे. हे असे राजकारण फार काळ टीकतनाहि. माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ विरोध असताना देखील करण्यातआली.मात्र, अपेक्षित पध्दतीने कारखाना चालला नाही. कारखान्यात अनेक वेळाऊसाचा रस वाया गेला. गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्यासत्ताधाºयांच्या निर्णयामुळे शेतकºयांचे गहु पिकाचे नुकसान झाले.मध्यंतरी निरा डावा कालव्याबाबत निर्णय झाला.त्यावेळी सत्ताधाºयांच्या विचाराचे सरकार असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका पवार यांनी केली. सत्ताधाºयांनी कारण नसताना माळेगावचा घास मोठा केला. इथुन पुढे माळेगावला बाहेरच्या ऊसाशिवाय गत्यंतर नाही. ३४०० रुपये दरसत्ताधाºयांनी दिला आहे. त्यापैकी २३४ रुपये अद्याप मिळालेले नाही. पाच वर्षात ५० रुपयांची ठेव मिळालेली नाही. जवळपास २८४ रुपये देणे बाकीआहे.शासनाने भरती करु नये,असे निर्णय घेतला आहे. निवडणुक लागली तरी देखील निवडणुक आल्यावर मते मिळविण्यासाठी नोकरभरती करतात,अशा बातम्या ऐकायलामिळतात. हे एक राजकारण आहे.खुल्या मनाने करायचे असते तर त्यांनी नवीनसंचालक मंडळ येण्याची वाट पाहणे अपेक्षित होते,असा टोला पवार यांनी माळेगांवच्या सत्ताधाºयांना लगावला.महाविकासआघाडीकडुन जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत.२ लाखांच्यााुढील,नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.मात्र,तो निर्णय घेताना राज्य सरकारला झेपेल,विकासकामांवर परीणाम होणारनाहि,याची दक्षता घ्यावी लागणार आहे. बारामती तालुक्याला कर्जमाफीचा १२०कोटींचा लाभ होणार आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्तविक केले.मदन देवकाते,योगेश जगताप,गुलाबराव देवकाते,अनिल जगताप यांचे भाषण झाले.मेळाव्यासाठी विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराध्यक्षनवनाथ बल्लाळ, सभापती नीता बारवकर, किरण गुजर, संदीप जगताप,केशवजगताप,संजय भोसले,शौकत कोतवाल आदी उपस्थित होते.————————————————————....कोणतेही ध्येयधोरण नसणाºया गुरुशिष्यांना बाजुला करा.. सहकारमहर्षी म्हणवुन घेणाºया सत्ताधाºयांनी त्या काळात सुरवातीला साखर नाममात्र दराने विकली.त्यामुळे सभासदांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.अनावश्यक नोकरभरती करुन शेतकºयांच्या प्रपंचाचे नुकसान के ल्याचा आरोपमाजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी केला. कोणतेही ध्येयधोरण नसणाºयागुरुशिष्यांना बाजुला करा,अशी टीका देखील जगताप यांनी केली.—————————————————
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील " महाविकासआघाडी पॅटर्न ": अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 8:27 PM
त्यांचा आग्रह नसेल,मात्र, त्यांचे ऐकण्याची तयारी
ठळक मुद्देमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळावा